
दैनिक चालु वार्ता गेवराई प्रतिनिधी –
गेवराई शहरातील आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थीनींनी स्वत: राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना गुरूवार दि. 4 ॲागस्ट रोजी पोस्टाने राख्या व शुभेच्छा पत्र पाठवले. या कार्यक्रमाला पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा सौ. योगिता चाळक , सुप्रिया तनपुरे, अर्चना टेके यांची प्रमुख उपस्थिती होती. देशात मोठे उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही, भाऊबीज असो की रमजान ईद, अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांचे रक्षण करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या नर्सरी ते बारावीच्या सर्व मुलींनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी वेगवेगळ्या धाग्याच्या अतिशय आकर्षक, सुबक अशा राख्या तयार करून पाठवल्या. आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या आर्ट व क्राफ्ट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. आर्ट व क्राफ्ट विभागाचे प्रमुख दिपक कुसेकर तसेच सुनीता मोटे , सुप्रिया जोशी, रोहिणी पवार , निता साळवे , सीमा वक्ते , अंजली खरात, , वैशाली मोटे , अर्चना मोटे , स्वाती कापसे आदी सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.