
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
वडेपुरी सर्कलमधील लोंढेसांगवी येथे माधवराव पाटील लोंढे उर्फ एम.डी.पाटील लोंढे, पिंटु पाटील लोंढे,गजानन पाटील लोंढे,व परिसरातील मंडळीकडून युवा नेते ,भावीआमदार मा. सभापती, जी .प. सदस्य नादेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस हा भव्य दिव्य पध्दतीने लोंढेसागवी येथे थाटामाटात क्रेन च्या सह्याने 1क्विंटल फुलांचा हार प्रविण पाटील चिखलीकर व वैशालीताई चिखलीकर याना घालून, ढोल ताश्याच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला,कार्यक्रम चे आयोजन पिंटू पाटील लोंढे व गजानन पाटील लोंढे यांनी केले. उपस्थित सभापती आनंद पाटील शिंदे, नगरसेवक संजय घोगरे पाटील , सरपंच किवळा शंकर ढगे, सरपंच टाकळगावकर भिमराव लामदाडे ,आकाश पाटील टाकळगावकर ,शिवाजी खानसोळे, आनंद चिलपिपंरे ,मारोतराव लोंढे, सुकराज लोंढे, निर्गुण लोंढे ,राजु लोंढे, दिपक लोंढे कृष्णा लोंढे महेश लोंढे,आदि वडेपुरी सर्कलमधील संपुर्ण मंडळी उपस्थित होते.वडेपुरी सर्कलमधे किवळा,टेळकी,ढाकणी ,या गावातील मंडळीकडून वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले.