दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
मुंबई/ सातारा. सातारा जिल्ह्यांतील पाटण तालुक्यांतील सात गावांचा पुनर्वसनचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासांठी ४ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यांचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे झालेले बैठकीतील या गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यांत येणार असून त्यांच्यासाठी खाजगी जमीन अधिग्रहित करुन ५५० घरे बांधण्यांचेही नियोजन करण्यांत आले आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री समितीच्या कक्षांत पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे भूसलखन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या बैठकीला आमदार शंभूराज देसाई अप्पर मुख्य सचिव ( महसूल) नितीन कारीर, मदत पुनर्वसन विभागांचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वित्त विभागांच्या सचिव श्रीमती ए.शैला, सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गावडे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी सातारचे जिल्हाधिकारी जयवंशी पुढे म्हणाले पाटण तालुक्यासह इतर भागातील पुनर्वसनांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. जिल्ह्यांतील धरणांमुळे काही गावांचे पुनर्वसन झालेले आहे. पण त्यांना जमीनी मिळालेल्या नाहीत किंवा अर्धवट स्थितीत पुनर्वसनांचा प्रश्न राहिलेला आहे असे सर्व प्रश्न सोडविण्यांबाबत मुख्यमंत्री आग्रही आहेत. आपणही आता अशा गावांचे प्रस्ताव देत असून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्सून व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्यांचे यावेळी नुतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
