
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी .
भंडारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आणि मूळचे पुणे जिल्ह्यांतील श्री. वसंत जाधव यांनी १९/९/२०२० रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांच्याकडून श्री.वसंत जाधव यांनी भंडारा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती. श्री जाधव यांनी भंडारा जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित करण्यासांठी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांना हातांशी घेवुन भंडारा जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीवर तसेच अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. पोलीस अधीक्षक श्री.वसंत जाधव यांच्या कार्यकाळामध्ये अनेक मोठ,मोठ्या कारवाया त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आले. बुधवारी रात्री उशिरा श्री. जाधव यांच्या बदलीचा आदेश बदलीचा आदेश गृहमंत्रालयांतून सचिव श्री. व्यंकटेश भट यांनी काढला. बदलीचा आदेश मिळताच श्री.वसंत जाधव यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे पदभार उत्स्फूर्त केला. शुक्रवारी सायंकाळी भंडारा जिल्हा पोलीस दलाचा पोलीस अधीक्षकांचा पदभार नूतन पोलीस अधीक्षक यांनी श्री लोहित मतानी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडूंन पदभार घेतला. ते नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यांनी नागपूर शहरांतील आपल्या रुबाबदार,शैलीने गुन्हेगारीवर सिंघम दणक्यांने आळा घालीत शांतता व सुव्यवस्थेचा संदेश देणारे असे श्री. लोहित मतांनी हे भंडारा जिल्ह्यांला पोलीस अधीक्षक म्हणून लाभले. नूतन पोलीस अधीक्षक श्री.लोहित मतांनी यांनी पदभार स्वीकारताच सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी त्यांचे दूरध्वनीच्या माध्यमांतून अभिनंदन करीत पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.