
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.७. राज्यात भाजप शिंदे गटाचे सरकार स्थापन होऊन महीना उलटुन गेला मात्र राज्यसकट हाकण्यासाठी अजुनही राज्यात मंत्रीमंडळ नाही. कधी स्थापन होणार हे खुद्द मुख्यमंत्र्यांना ही माहीत नाही. राज्यात फुटीर सेना गटाकडे मुख्यमंत्री पद आहे मात्र आजवरच्या कामगीरीला पाहता ते फक्त काळजीवाहु मंत्रीच वाटतात. कारण ज्या मुख्यमंत्र्यास स्वत:चे मंत्रीमंडळ नेमता येत नाही तो मुख्यमंत्री किती कामगीरी बाज आहे यावरुन कळते. नामधारी पद निर्माण करुन संवैधानीक व्यवस्थेला खिळ घालणे हे भाजपचे सुत्रच आहे ते कसे हे महाराष्ट्रातील सध्याच्या दोन सदस्यीय कॅबीनेटच्या वगनाट्यावरुन कळतेच.
मुख्यमंत्री मुंबईत कमी दिल्लीच्याच दौ-यावर अधीक आहेत. कळत नाही राज्यात हुकमी एक्का कोण ? शहा-मोदी जोडी चा वरचष्मा राज्यात आहे हे ऐव्हाना जनतेला कळलेच आहे. राज्यात राज्यपाल सक्रीय तर मुख्यमंत्री हे वाचुन निर्णय देतात. त्याच्या कार्यकाळात विक्रमी अध्यादेश काढले परंतु ते राबवणार कसे. यावर सरकारच्या कारभारावर न्यायालयाने सुध्दा ताशेरे ओढले. महाराष्ट्रातला दोन जणांचे कॅबीनेट हा विक्रम बहुतेक आबाधीतच राहणार. भाजपने ऑपरेशन लोटस नुसार महाविकास आघाडी सरकार फोडले मात्र आपले अस्तर लावलेले सरकार काही आकाराला येत नाही. कारण आश्वासन देता येते मात्र पार पाडता येत नाही. मंत्री कोणाला बनवावे हा शिंदे गटाचा प्रश्न तर आहेच मात्र तेवढाच मोठा भाजपा सुध्दा. कारण सेना फोडली आता भाजप फुटण्याच्या मार्गावर आहे. हो हे खरे आहे….. कारण सत्तेची लालसा व धुसफुस भाजपमधे काठोकाठ भरली आहे. फडणवीस हे ज्याप्रकारे दिल्ली वा-या करत आहेत हे त्याचेच द्योतक. पत्रकार परीषद मधे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची देहबोली सर्वकाही स्पष्ट करत आहे. फडणवीस मोजुन बोलतात शिंदे बोलुन मोजतात. हे जे काही चालले आहे त्यावरुन त्यांची अस्वस्थता लपत नाही. शिंदे यांचे वारंवार ओठ हलवणे दाढीवरुन हात फिरवणे मान तिरपी करुन प्रश्नांना बगल देणे आणी फडणवीस हाताची घडी बांधुन शब्दांवर लक्षपुर्वक तोलुन बोलणे हे त्यांच्या स्वभावाच्या विपरीत आहे. असे कोणते दडपण आहे की सरकार मुक्तपणे कामकाज करु शकत नाही ?
काल शिंदेगटाचे प्रवक्ते केसरकर यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी केली , भाजपचे बोलघेवडे नेते सध्या संधी असुनही कोणत्याही टिव्ही वाहीनीवर मुलाखत देतांना दिसत नाहीत. कारण सार्वजनीक ठिकाणी बोलण्यावर त्यांना बंदी आहे. ते लोकप्रतीनीधी जरी असले तरी त्यांना बोलण्याची परमीशन नाही. आलेल्या आदेशाला वाचणे ऐवढेच त्यांचे काम. जनहीत हा फक्त परवलीचा शब्द. राज्यात अघोषीत आणीबाणी लादलेली आहे. राज्यात आभासी सरकार आहे भास आहे मात्र अहसास नाही. मंत्रालय ते दिल्ली आणी दिल्ली ते वर्षा ह्या प्रवासातच कॅबीनेट गोलगोल फिरत आहे. राज्यात पुरसदृष्य परीस्थीती आहे, हाहाकार माजलाय, निसर्गाचे रौद्ररुप जनतेची दाणादण उडवत आहे. मात्र राज्यात अंधेर नगरी चौकट राजा चा स्विक्वल चालु आहे. देशात महाराष्ट्रात स्वातंत्र्याची पंच्यात्तरी साजरी होत आहे आणी आमच्या राज्यात १५ ऑगस्टला ध्वजारोहण होईल मात्र ते सुध्दा आभासीच असेल का ?
संतोष गवई