
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजूरा
जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे भीम आर्मी चंद्रपूर यांच्या नैतृत्वात अनैशा वाहन चालक व इतर संगठना अ सुरज भाऊ उपरे यांच्या मार्गदर्शनात सी सी आर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत वाहन चालक बांधवाना मागील पाच महिन्यापासून वेतन न दिल्या कारणास्तव त्यांच्या न्यायिक हक्कासाठी भीम आर्मी जिल्हा चंद्रपूर तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने शिष्ठबद्ध स्वरूपाने करण्यात आले, सी सी आर. कंपनी ने सिंग बाबू यांना मध्यस्थी साठी पाठविले असता वाहन चालकांच्या सर्व मांगण्या पूर्ण करण्यास सी सी आर कंपनी तयार आहे असे आश्वशीत केले परंतु शेवटी सी सी आर. कंपनीने यू टर्न घेत लिहून देण्यास नकार दिला.
त्यामुळे आक्रोश आंदोलन करण्यात आले ते सुद्धा संविधानिक पद्धतीने पार पाडल्या गेले पण सी सी आर कंपनीच्या कानावरून उ सुद्धा चालत नाहीय हे बघता कंपनीत कार्यरत असलेल्या सर्व वाहन चालक बांधवावर व त्यांच्या परिवारावर अशी ही उपास मारीची वेळ आलेलीच होती. त्यामुळे शेवटी त्या सर्वांनी मिडून त्यांच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हा उप प्रमुख सुरज भाऊ उपरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक 05/08/2022 ला दुपारी 12:30 पासून गौरी डीप गेट राजुरा समोर तौफिक उद्दीन शेख, एकनाथ गजानन नेहारे, विक्रम देवराव रंगारी, राहुल रमेश चांदेकर,संजय हनुमंत कोयलवार,विकास विनोद माऊलीकर, शंकर गणपत गेडाम, राजेंद्र विठ्ठल बसवंते,सुमित नारायण सपळी, गणेश शंकर देवी हे आमरण उपोषणास बसले आहेत.वाहन चालक बांधवांच्या वेतन वाढ,पी.एफ. आणि थकीत वेतन त्वरित देण्यात यावे या प्रमुख मांगण्या आहेत.
आमरण उपोषण करीत असताना उपोषण कर्त्यांची प्रकृती हालावलि किंवा त्यांच्या जीवाला काही हाणी पोहचल्यास सर्वस्वी जवाबदारी ही सी.सी. आर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचीच राहील असे भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी कळविले.