
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : रविवार, दिनांक ०७/ऑगस्ट २२ रोजी परभणी जिल्हा परिसरात गंभीर अपघातांच्या तीन घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी दाखल करुन दोन घटनांमधील अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे तर तिसऱ्या घटनेतील पूलावरुन पावसाच्या पाण्यात दुचाकीवरून वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.
रविवार हा सुट्टीचा दिवस असला तरी कुठे संततधार कोसळणारा मुसळधार पाऊस तर कुठे पावसाची भारी रिपरिप गंभीर अपघातांना कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे. जालन्याहून व्हाया परभणी मार्गे नांदेडला भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याची घटना पेडगाव-शहापूर पाटीजवळ गंभीर स्वरुपात घडली. शेतीसाठी लागणारे साहित्य घेऊन एमएच २८ एबी ३१६५ क्रमांकाची बोलेरो भरधाव वेगाने व्हाया परभणी मार्गे नांदेडला जात होती. तथापि वेगात असलेल्या या बोलेरोचा टायर पेडगाव टाकीजवळ अचानक फुटला गेला. त्यात चालकाला दुखापत झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अपघाताची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पो.ह. एस.डी.फड यांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला सारले व खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळवले.
तर दुसऱ्या एका घटनेत पूर्णा शहरापासून काही अंतरावर दोन वाहनांची भीषण टक्कर होऊन त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पूर्णा शहराकडून नांदेडकडे एमएच १२ एफएक्स ३२९ क्रमांकाची दुचाकीची पूर्णेकडे भरधाव वेगाने येणा-या एमएच २६ बीई ०३७ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारशी भीषण टक्कर झाली. गौर गावाजवळील सोमेश्वर मंदीराचे या शिवारात घडलेल्या या घटनेत दुचाकीचा चालक वैजनाथ बोखारे हा गंभीर जखमी झाला आहे.
सदर घटनेची खबर चुडावा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शी शिवप्रसाद मुळे, पीएसआय जमादवारे, विशाल बनसोडे, सूर्यकांत केतकी आदींच्या पथकाने जखमी चालक बोखारे यास पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.
तिसरी घटना लगतच्या हिंगोली तालुक्यातील आहे. काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खेडा ते सिरसम दरम्यानच्या पुलावरुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जात होते. त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पूल पार करुन जाणारा दुचाकी स्वार आपल्या वाहनांसह वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून जात असता ग्रामस्थांनी त्याला कसेबसे करुन वाचवले. सदर पूलाची उंची वाढवली जावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून सरपंच पंजाबराव गंधे यांच्यासह ग्रामस्थांनी सुध्दा ही मागणी लावून धरली आहे तरीही प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. आणखी किती जणांचे असे जीवघेणे अपघात झाले पाहिजे, अशी प्रशासन वाट पहात असावे, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी ढिम्म शासन व प्रशासनाला पुन्हा एकदा विचारला आहे. एकूणच पाऊस काळात अशा लहान मोठ्या गंभीर घटना सातत्याने कुठे ना कुठे होतच असतात परंतु शसनस्तरावरील पोलिसांशिवाय आणखी दुसरे कोणीच धावून येत नसते एवढे मात्र खरे.