
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
सभागृहातील हस्तक्षेप टाळण्याची सदस्यांची मागणी.
देगलूर:बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथील ग्रामपंचायतीत महिला सरपंच असताना त्यांच्याऐवजी त्यांचे सासरे व पतीकडून ग्रामपंचायतीचा कारभार केला जातो. शिवाय ग्राम पंचायतीमधील कारभारात पदसिद्ध सदस्यच कामकाजात भाग घेण्याचा परिपाठ असताना याला बगल देऊन प्रतिनिधींकडुन कारभार व हस्तक्षेप होतो. ज्यामुळे पंचायत राजच्या मूळ धोरणाला या प्रतिनिधींकडून खो दिला जातो. या ग्रामपंचायतीचा कारभार या महिला सरपंचांच्या प्रतिनिर्धीकडून, नातलगांकडून केला जात असल्याने या प्रकाराविरोधात दस्तुरखुद रुद्रापुरच्या ग्रामपंचायत सदस्याने आक्षेप नोंदवित तक्रार दाखल केली आहे.
बिलोली तालुक्यातील रुद्रापूर येथे नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असून येथे सरपंचपदी महानंदा अशोक शेळके ह्या सरपंचपदी विराजमान आहेत. त्या माजी
सरपंच बाबा शेळके यांच्या सुन असून सदरील ग्रामपंचायतीच्या कारभारात महानंदा शेळके यांच्या ऐवजी त्यांचे सासरे आणि पतीकडुन निर्णय घेतले जातात. शेळके पिता-पुत्रांचा ग्रामपंचायतीत कसलाच संबंध नसतांना त्यांचा ग्रामपंचायतीत सारखा असतो. इतकेच नाही तर मासिक बैठक, ग्रामसभा आणि ग्राम पंचायतीच्या स्तरावर असलेल्या वेगवेगळ्या बैठका यात सरपंच बाई जि.प.च्या यांच्या ऐवजी त्यांचे प्रतिनिधीच अधिकारी वर्षा विशेष भाग घेतात. इतकेच नाही तर निर्णय सुद्धा घेतात. त्यात कहर म्हणजे सरपंच बाईची सही सुद्धा त्यांच्या प्रतिनिधींकडुन केली जाते. शिवाय कामकाजात भाग घेतात. विशेष म्हणजे केवळ पदसिद्ध सभासद यांनीच ग्रामसभा आणि मासिक सभेतील कामकाजात सहभाग नोंदवावा असा शासकिय प्रघात असतांना या नियमांना येथे बगल दिली जात आहे. या गंभीर
बाबींविरोधात अनेकदा येथील ग्राम पंचायात सदस्य कमलाकर जमदडे यांनी लक्ष वेधले. ग्रामसेवकांच्या निदर्शनास ही बाब आणुन दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी जमदडे यांनी सरपंचाव्यतिरिक्त नातलगांचा वाढलेल्या हस्तक्षेपा विरोधात मुख्य कार्यकारी ठाकुर यांच्याकडे रितसर तक्रार दिली. तक्रारीत जमदडे यांनी ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही सुद्धा बसवण्याची मागणी केली. सीसीटीव्ही बसवण्यासंबंधी प्रशासन गंभीर नसेल तर स्वखचनि सीसीटीव्ही बसवणार, फक्त परवानगी द्या अशी प्रशासनास निवेदनाच्या माध्य मातुन मागणी केली आहे. प्रशासन यावर काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.