दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वामनराव कराळे
खळबळजनक माहितीमुळे अनेकांचे दणाणले धाबे
परभणीत ४०० एकरांपेक्षा जास्त वक्फ बोर्डाच्या जागा
परभणी : शहर व जिल्हा परिसरात असलेल्या वक्फ बोर्डाच्या जागा ज्यांनी ज्यांनी बळकावल्या आहेत, त्या सर्वांवर कठोर कारवाईचा बडगा लवकरच उचलला जाणार असल्याची खळबळजनक माहिती आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी दिली आहे.
परभणी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपूडकर यांच्या निवासस्थानी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांनी भेट दिली असता तेथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मिर्झा यांनी सांगितले की, परभणी शहर व जिल्हा परिसरात वक्फ बोर्डाची ४०० एकरांपेक्षा पेक्षा अधिक जागा आहेत. त्यापैकी बहुतांश जागांवर कित्येकानी अतिक्रमण केले असल्याचे कळते. परन्तु त्यांना ते पचणारे नसून येत्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत अतिक्रमण झालेल्या सर्व जागांचा सर्वे केला जाणार असून ते काम अधिक प्रगती पथावर आहे. ज्या कोणी त्या जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सर्व जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात घेतल्या जातील मग कोणीही आणि कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्याची पर्वा न करता त्यांनाही कायद्याचा बडगा दाखवला जाईल असंही ते म्हणाले. यावेळी आमदार सुरेश वरपूडकर यांनीही मार्गदर्शन केले.
या प्रसंगी माजी महापौर भगवान वाघमारे, वक्फ बोर्डाचे जिल्हाध्यक्ष इनात काद्री, शहराध्यक्ष माजिद इनामदार आणि इत्तर पदाधिकारी उपस्थित होते. एकूणच डॉ. मिर्झा यांच्या या विधानामुळे परभणी शहरात सर्वत्र मोठी खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे.
