
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे.हा महोत्सव आर सी पटेल भोरखेडा विद्यालयात मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांसहित साजरा होतोय दिनांक 9 ऑगस्ट 22 रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी वेशभूषा मोठ्या दिमाखात पार पडल्या. अनेक विद्यार्थ्यांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले, प्रसंगी प्राणाची आहुती दिली.अशा लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,नेताजी सुभाष चंद्रबोस,स्वातंत्र्यवीर सावरकर,राणी लक्ष्मीबाई, साने गुरुजी, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर अशा विविध स्वातंत्र्यसेनानींच्या वेशभूषा सादर केल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री पदमसिंह जाधव मा. सभापती यांनी भूषविले. तसेच गावातील व पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी मान्यवर श्री. नाना वाघ सरपंच, श्री पिरचंद भील, श्री साईदास जाधव, श्री बाबुराव गुजर, श्री दरबार जाधव, श्री मनोहर पाटील, श्री पंढरीनाथ भिल, श्री अनार जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री महान क्रांतिकारक भगतसिंग व बिरसा मुंडा आणि विद्यामाता देवी सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने अध्यक्षांनी व मान्यवरांनी कार्यक्रमाच्या शुभारंभ केला.
प्रारंभी प्राथमिक विभागाने आपल्या वेशभूषा सादर केल्या. सर्वच स्पर्धक विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पक व उत्साहाने वेशभूषा स्पर्धेत सादरीकरण केले. मोठ्या गटातून दुर्गेश्वरी राजपूत (प्रथम), जय चौधरी (द्वितीय) कुंदन पाटील (तृतीय)यशवर्धन पाटील (उत्तेजनार्थ) तर लहान गटातून हरीश धनगर (प्रथम) तेजस महाजन (द्वितीय) मोक्षदा देवरे (तृतीय) सृष्टी पाटील (उत्तेजनार्थ) अशाप्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
श्री.आर एफ शिरसाठ प्राचार्य, श्री पी व्ही पाटील पर्यवेक्षक व श्री ईश्वर पाटील मुख्याध्यापक (प्राथमिक)यांच्या प्रेरणेने व कुशल मार्गदर्शनाखाली प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी ठरला.