
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता ज्यानं आपल्या विनोदी स्वभावानं आणि अंदाजानं प्रेक्षकांना वेड लावले अशा राजु श्रीवास्तवच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला आहे.
त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजु हा ट्रेडमिलवर धावत होता त्यावेळी अचानक त्याला आलेल्या चक्करमुळे तो bबेशुद्ध पडला. त्याला पुढील उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केवळ विनोदी कलाकार म्हणून नव्हे तर उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचा अध्यक्ष म्हणूनही राजुची वेगळी ओळख आहे.
गेल्या दीड दशकांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या राजुचा चाहतावर्ग मोठा आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमधून राजुला मोठं व्यासपीठ मिळालं. त्यानंतर तो चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या विनोदी अंदाजानं प्रेक्षकांना जिंकुन घेतलं होतं. याशिवाय बॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपट महोत्सव, अॅवॉर्ड शोमध्ये देखील राजुचा सहभाग हा नेहमीच महत्वाचा ठरला आहे. काही वेळा त्यानं त्याच्या अतिउत्साही आणि वाचाळ स्वभावामुळे बॉलीवूड सेलिब्रेटींचा रागही ओढावून घेतला होता.
राजुला रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. राजु हा नेहमीप्रमाणे त्याच्या ट्रेडमिलवर धावत असताना त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध होऊन पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.