
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दि.११ व उद्या २ दिवस सातारा जिल्हा दौऱ्यांवर येत असून दुपारी १२ वाजता ते मंत्रालयातून मोटारगाडीने सातारा जिल्ह्यांकडे रवाना होतील तर दुपारी सातारा जिल्हा आढावा बैठक घेवुन ते सायंकाळी पाच वाजता महाबळेश्वर तर सहा वाजता तापोळा येथे त्यांच्या नागरिक सत्कार करणार आहेत. तर सायंकाळी सात वाजता ते त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यांतील दरे या मूळ गावी ग्रामदेवतेचे दर्शन घेतल्यानंतर ते सात वाजल्यापासून ग्रामस्थांशी हितगुज करणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता मोटारगाडीने मुंबईकडे रवाना होतील. निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यांपासून त्यांनी आतापर्यंत अनेक जिल्हा दौर केले असुन. सातारा जिल्हा हा दौरा प्रथमच असल्यांची माहिती सूत्रांकडूंन देण्यांत आली.