
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
छावा संघटनेच्या बैलगाडी मोर्चात कंधार/पेठवडज तालुक्यातील हजारो शेतकरी सामिल होणार बालाजी पाटील मसलगेकर
पेठवडज /…नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर दि 12 /08/2022रोजी धडक बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात. कंधार. पेठवडज. मुखेड. तालुक्यातील हजारो शेतकरी सामील होणार असल्याची माहीती अखिल भारतीय छावा संघटनेचे वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष बालाजी पाटील यांनी सांगितले आज पर्यंत शेतकऱ्यांना पुळका दाखवणारे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारणारे सरकार मंत्री पदात मंगन आहेत तर राजकीय पुढारी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज आज बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे बळीराजाला आत्महत्या करणे हाच पर्याय शिल्लक राहिला असून बळीराजाच्या विविध मागण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या राजकीय पुढारी व प्रशासन जागे करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ओला दुष्काळ कार्यालय जाहीर करण्यासाठी धडक बैलगाडी मोर्चाची आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे प्रमुख नेतृत्व अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील ताटे जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तरी शेतकरी बांधवांनी या बैलगाडी मोर्चा हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे अशी आव्हान बालाजी पाटील मसलगेकर यांनी केले आहे