
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल २०२२ उन्हाळी सत्राच्या एकुण ७४१ अभ्यासक्रमाच्या परीक्षापैकी विद्यापीठस्तरावरील ५६१ परीक्षांपैकी काही परीक्षांना दि .१९ जुलै २०२२ पासून एम.सी.क्यू.ऑफलाईन पध्दतीने सुरळीतपणे सुरवात झाली . तथापि कोल्हापूर,सांगली व सातारा या जिल्हयात येत्या आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे दि.१० व ११ ऑगस्ट २०२२ रोजी होणा-या विद्यापीठाच्या परीक्षा हया स्थगित करण्यात आल्या आहेत.तसेच उद्या होणाऱ्या दि.१२व १३ऑगस्ट ,२०२२ रोजी होणा-या सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत.विद्यापीठ परिक्षेत्रातील जिल्हयामध्ये उदभवलेल्या पूर परिस्थीतीमुळे तसेच अद्याप पूर परिस्थीती पुर्ववत झालेली नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत आहे . कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दि.१२ व १३ऑगस्ट ,२०२२ रोजी होणाया सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत. तसेच स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेचे नविन वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करणेत येईल.सदर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येत असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक मा.डॉ.ए.एन. जाधव यांनी दिली.