
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथून जवळच असलेल्या पोलीसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत च्या वतीने प्रत्येक मुलास एक याप्रमाणे 195 मुलांना गणवेश वितरण करण्यात आले. या गणवेश वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.वैजनाथ खेडकर सर तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.पिराजी धुळगंडे व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.बोळेगावे साहेब तसेच माजी उपसरपंच संग्राम हाके व संग्राम पोले व ग्रामस्थ शिक्षण प्रेमी नागरिक हे उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील पोलीसवाडी येथील एकमेव ग्रामपंचायत आहे की गेली चार वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी एक गणवेश या पद्धतीने वितरण करते. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.पिराजी धुळगंडे यांनी प्रास्ताविक केले तसेच ग्रामसेवक बोळेगावे साहेब यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.नागेश स्वामी प्राथमिक पदवीधर शिक्षिका सौ.ज्योती सरोदे मॅडम व सौ. वर्षा सलगर मॅडम,श्री.जालने सर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मारुती केंद्रे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.शंकर गायकवाड सर यांनी मानले.