
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे.
त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे. अमेरिकी क्रूड फ्युचर्स 1.8 टक्क्यांनी वाढून 93.55 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. त्याचवेळी ब्रेंट क्रूड फ्युचर्स 1.6 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 98.94 वर व्यवहार करत होते. तर दुसरीकडे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. देशात आजही पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असून दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डीझेल 89.62 रूपये प्रति लिटरने दर स्थिर आहेत.
====================
*देशातील प्रमुख शहरांमधील किंमती*
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दर आहे. तर, राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दर आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 107.98 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर असल्याची माहिती IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
======