
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
श्री संत मोतीराम महाराज दिंडी समितीच्या वतीने लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दर वर्षी प्रमाणे श्री संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोहा ते श्री क्षेत्र फळा (गोदावरी काठी) ता. पालम पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित राहुन दिंडी सोहळ्याला सहभागी राहून सहकार्य करणारे लोह्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री गजानन सावकार सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार यांचा दिंडी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच दिंडी समितीला ज्यांनी – ज्यांनी सहकार्य केले व्यंकट दांगटे, बालाजी सावकार कोटगिरे ,शिराळे ,संजय चव्हाण, केशव पवार,गोविंद वड,खंडू पाटील पवार, गजानन दांगटे, गजानन स्वामी ,आदी सहकारी भाविकांचा सत्कार दिंडी समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच लोहा येथे गेले २१ दिवस ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण वाचन ह भ प आत्माराम महाराज यांच्या मधुरवाणीतुन जुना लोहा वासियांना ऐकाकाला मिळाली व त्यांची सांगता जुना लोहा येथुन पायी दिंडी काढून श्री क्षेत्र फळा येथे रवाना झाली. सदरील दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी संजय चव्हाण, मारोती दांगटे ,नामानंद रामेज्वार, गोपाळ सावकार, गायकवाड सर, आदी भाविक भक्तांनी परीश्रम घेतले व दिंडीत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभाग घेतला व सोहळा यशस्वी केला.