
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी:- दशरथ आंबेकर:-
मौजे इरेगाव येथे स्वतंत्र्यांच्याअमृत महोत्सव वर्षाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा घर घर तिरंगा फडकवव्यातं आल्यानंतर मौजे इरेगाव येथे दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी गावातील मुख्य रस्त्याने प्रभात फेरी काढून घोषणा देण्यात आल्या व गावात जनजागृती करण्यात आली दि.१३ ते १५ऑगस्ट तिरंगा फडकवण्याच्या विषयी मुख्याध्यापक फोले सर,बबुलगेवार सर,राठोड सर,पवित्रे यांनी सखोल अशी माहिती सांगुन,देशाविषयी महत्व पटवून दिले.तालुकाभरअशाच स्वरुपाची जनजागृती करण्यात येत आहे.आज पासून सर्वत्र गावात व सर्वच्या घरावर तिरंगा फडकवल्यांचे पाहायला मिळाले आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे इरेगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विद्यमाने दि.१२ऑगस्ट२०२२ रोजी प्रभातफेरी काढण्यात आलीआहे. हर घर तिरंगा,भारत माता की जय अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. प्रभातफेरी नंतर शिक्षकांनी दि.१३ते १५ऑगस्टच्या तीन दिवस ध्वजारोहणाचे लोकांना महत्व पटवून दिले.मौजे इरेगाव ग्रामसेवक सौ.मिपुंलवाड एम.टी.,सरपंच सौ. रत्नमाल अमोल गोरे,उपसरपंच रामा गंट्टलवाड,अंगणवाडी सेविका सौ.निर्मला गंगाधर मांगीरवाडआशा वर्कर खोकलेताई,श्रीमती रुखमाबाई अंकुलवाड,ग्रामपंचायत सदस्य देवराव मेटकर,आत्माराम गायकवाड, संभाजी मिराशे,अमोल गोरे,पत्रकार दशरथ आंबेकर,शाळासमितीचे अध्यक्ष मारोती उटनुरवाड,लक्ष्मणबेंद्रे सह गावातील नागरिकांची मौठ्या प्रमाणात उपस्थिती होती.