
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात हर घर तिरंगा अभियानाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन लोहा सह्याद्री शाळेच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत भारत सरकारच्या आदेशानुसार तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. देशभक्ती जागृत करण्यासाठी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे व भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशभर दि. १३ आॅगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत असून यांची लोहा शहरात जनजागृती करण्यासाठी लोहा भव्य रॅली काढण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आपल्या देशाचे राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंडयाचे वाटप केले.
आज लोहा शहरातील सह्याद्री शाळेनी रॅली काढली भारत माता की जय अशा नाऱ्याने घोषणा दिल्या
यावेळी सह्याद्री शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे सर ,जयश्री शिंदे ,मुख्याध्यापक नागेश हीरास ,इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले, रुक्मिणी धोंडगे ,सुप्रिया वाडेवाले ,काशिनाथ पांचाळ ,अमोल शिरसाट ,श्रीनिवास बिडगर, फिरोज घोडके ,राजू पोळ व सह्याद्री शाळेचा पूर्ण स्टॉप त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार जिल्हा प्रभारी डी एन कांबळे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील कदम शेख मुर्तुजा बाळासाहेब कतुरे फिरोज मणियार पिनू पाटील आदी उपस्थित होते.