
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
आज दिनांक १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सतीश आणेराव मित्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभर आझादीचा अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान हे श्रेष्ठ दान वाचवी रुग्णांचे प्राण या म्हणीप्रमाणे गरजू रुग्णांना उपचारासाठी रक्त पिशवी वेळेवर मिळावी म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत सतीश आणेराव मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ आॅगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असुन सदरील रक्तदान शिबिर हे लोहा पोलीस स्टेशन समोर सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार असून या कार्यक्रमांचे उद्घाटन लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे, पोलीस निरीक्षक संतोष तांबे,फौजी प्रसेनजित कांबळे, फौजी जयराम सोनवळे, फौजी अंकुश लोंढे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. मिलिंद धनसडे, नगरसेवक पंचशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भाऊ शेटे,हे.नि. फौजी बालाजी चुकलवाड, आदी उपस्थित राहणार असुन या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सतीश आणेराव व मित्रमंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.