
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री.रमेश राठोड
=========================
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील अतिदुर्गम व अतिशय मागासलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावळी सदोबा परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा व झापरवाडी या आदिवासी बहुल गावातील शेतकऱ्यांना शेतात व स्मशानभूमीत जाण्यासाठी असलेल्या दोन्ही पांदन रस्ते मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी आज नायब तहसील कार्यालय सावळी सदोबा येथे माजी जि.प.उपाध्यक्ष मुबारक तंवर व झापरवाडी गावातील ग्रामस्थासह आमरण उपोषणला बसले असताना,उपोषण मंडपाला विधुत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वैध मा.रा.वि.क.यवतमाळ विभाग, पवन शेडामे उपकार्यकारी अभियंता आर्णी , शेख अभियंता सावळी विभाग, आर्णीचे तहसीलदार परसराम भोसले,नायब तहसीलदार तुंडलवार ,पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजभारे यांनी वरील मागणी संदर्भात ठोस लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्यात आले,
या उपोषणास झापरवाडी गावातील सरपंच मीराबाई श्रीराम पेंदोर,सावळी गावातील सरपंच अंजनाताई गेडाम व उपसरपंच दिग्विजय शिंदे,शहीद पिता गोविंदराव आडे,वैशाली गौरकर,ललीता पूरके, अंजना पेदोंर,सुमन मेश्राम,कौसल मडावी,उत्तम पैकीने, श्रीराम पेंदोर, सुनिल पुसनाके,घनश्याम मेश्राम,मनोज पवार,सुनील पुसनाके, ज्ञानेश्वर मडावी,मंदा पवार,कैलास मडावी,पसराम मडावी सह परिसरातील अनेक महिला , पुरुष मंडळी सहभागी झाले होते.