
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
—–+——–+—-
परभणी : लोहा तालुक्यातील तीर्थक्षेत्र अंतेश्वर येथे भव्य अशा सभागृहाची नितांत आवश्यकता असून ती लवकरात लवकर पूर्णत्वास नेली जावी असा समस्त गावकरी मंडळींचा संकल्प आहे. युवा नेते विक्रांत शिंदे यांनी काल अचानक गावाला भेट देऊन मंदीर परिसराची सुध्दा पहानीकेल्याचे समजते. काही राजकीय पुढारी व लोकसहभागातून नुकताच उभारलेले श्री बजरंग बली चे देवालय समस्त भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे परंतु सदर मंदीराच्या सभोवतालचा परिसर अजूनही अविकसित असाच राहिला असल्यामुळे मंदीराला जी शोभा येणे आवश्यक आहे, ती दिसून येत नाही. त्यामुळे अविकसित अशा मंदीर परिसरात भव्य असे सभागृह निर्माण करणे गरजेचे असून ती मागणी युवा नेते विक्रांत शिंदे यांनी पूर्णत्वास न्यावी अशी अपेक्षा आहे.
लोहा तालुक्याचे आमदार म्हणून श्री. श्यामसुंदर शिंदे हे नेतृत्व करीत आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची धुरा त्यांनी मागील अडीच वर्षांपासून चांगलीच सांभाळली आहे. अटीतटीच्या लढाईत आमदार म्हणून लोहा-कंधारच्या सूज्ञ मतदारांनी त्यांचे पालकत्व स्वीकारलेच आहे. गावो गावी चांगले रस्ते, पिण्याचे मुबलक व नियमित पाणी पुरवठा, अखंडित वीज पुरवठा, गावातील घाण व नैसर्गिक पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला पाहिजे यासाठी नाल्या व गटारांची सोय, शैक्षणिक सुविधा, वाचनालये, मुबलक व नियमित स्वस्त धान्य पुरवठा, गाव तेथे रस्ता, त्यावर खडीकरण व डांबरीकरण, गाव तेथे एस्.टी. वाहतूक सेवा, समाज मंदीर, देवालये या व अशा मुलभूत नागरी सुविधा जनतेला पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार तथा स्थानीय स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचीही जबाबदारी आहे. आमदार म्हणून मागील अडीच वर्षे केलेली लोकसेवा आणि लोकाभिमुख विकास कामे उल्लेखनीय अशीच दिसत आहेत. तथापि उर्वरित विकास कामे आणि समस्त मतदार जनतेची धार्मिक भावना म्हणून अपेक्षित असलेली देवालये, सभागृह वा परिसर सुशोभित करणे ही मागणी सुध्दा पूर्णत्वास नेणे एक लोकसेवक, पालक म्हणून आमदार या नात्याने श्यामसुंदर शिंदे साहेबांची ही जबाबदारी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
त्याशिवाय आमदारांच्या धर्मपत्नी सौ.आशाताई शिंदे यांनी सुध्दा त्यांच्या साथीने समाज कार्याचा वसा घेतला आहे. गावोगावी फिरून त्यांनीही नागरी विकास कामांचा अभ्यास केला आहे. घरगुती, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अथवा लग्न व बारशांचे सोहळे उपस्थिती लावून आशावादी जनतेची मने त्यांनीही जिंकली आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांनाही लोकसेवेची संधी नक्कीच मिळू शकेल यात शंकाच नसावी. त्याचेच फलित म्हणून समाज सेविका आणि आमदार पुत्र म्हणून विक्रांत शिंदे यांचेकडेही जनतेतून एका आगळ्या वेगळ्या अपेक्षेने पाहिले जाणे स्वाभाविक आहे. युवा नेतृत्व म्हणून जनसेवा करण्याची त्यांना भरपूर संधी आहे. किंबहुना त्याच भावनेने त्यांच्याकडे अंतेश्वर नगरीच्या जनतेने भव्य अशा सभागृहाची मागणी केली असावी असे नक्कीच वाटणे अपेक्षित आहे. लोक सेवा आणि देव सेवा या शिदोरीचे गाठोडे ज्यांच्या पाठीशी मजबूत आहे, त्यांना आयुष्यात कधीही आणि काहीही कमी पडत नाही, असा बोलबाला पूर्वापार चालत आला आहे. म्हणूनच की काय, गावोगावी साजरे होणारे मोठमोठे सोहळे, निर्माण कार्ये यांच्यात आपणासारख्यांचेच मोठे योगदान राहिले जाते, हे कोणीच नाकारु शकणार नाही. केवळ अपेक्षाच नव्हे तर खात्री आहे की, उदयोन्मुख नेता म्हणून पाहिले जाणा-या विक्रांत शिंदे यांच्या पुढाकाराने अंतेश्वर नगरीतील नियोजित सभागृहाचे पूण्य काम लवकरच पूर्णत्वास जाईल, नव्हे यात तिळमात्र शंका नाही.
विक्रांत शिंदे हे जेव्हा अंतेश्वर नगरीत आले, त्यावेळी त्यांनी मंदीर परिसराची पाणी केली. त्यांच्या सोबत सरपंच तुकाराम पाटील कराळे, चेअरमन अच्युतराव कराळे, माजी चेअरमन सुदामजी कराळे, माजी सरपंच बबनराव बोरुळे, उद्धवराव कराळे, करण कराळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर कराळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते ते मोठ्या अपेक्षेनेच होते हे विसरुन चालणार नाही.