
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून त्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. महागडी बी-बियाणे, औषधी, खते घालून शेतीत पेरण्या केल्या. त्यासाठी अल्लाच्या सव्वा आर्थिक मेहनताना देऊन मजूरांना आणणे भाग पडले होते. परिवारांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी केलेला हा आटापिटा खरा परंतु अखेर निसर्गानेही होण्याचे नव्हते केले. परिणामी महागाईच्या आणि कर्जाच्या बोजा खाली दबलेला हा समस्त शेतकरी वर्ग कमालीचा मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने मुळीच दिरंगाई न लावता सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केली.
तालुक्यातील दुरडी गावासह अनेक गावांतील ग्रस्त शेतीची व पिकांची तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ. पाटील यांनी परभणीचे तहसीलदार डॉ. संदेश बिराजदार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी यांना सोबत नेले होते. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे झालेले नुकसान सदरच्या अधिकारी वर्गाची पाहिले तेव्हा झालेली दयनीय व चिंताजनक अवस्था त्यांच्याही लक्षात आली असावी, हे कोणीही नाकारु शकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक दिरंगाई न लावता सरसकट पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी असेही आ. पाटील म्हणाले.