
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी १५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे सहकार मंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित या सोहळ्याला जिल्हाधिकारी आंचल गोयल, परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुरेश देशमुख, पोलीस अधीक्षक जयंत मीना, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अन्य शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबीय, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
दि. १४ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्वानपथकाद्वारा तपासणी करण्यात आली.
ध्वजारोहणाचा आजचा हा सोहळा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने परंतु उत्साहात साजरा करण्यात आला.