
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष माननीय प्रवीण दादा रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली भुम शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी भूम शहर संपर्क कार्यालय येथे प्रवीण दादा रणबागुल यांच्या हस्ते नूतन कार्यकारणीचा सत्कार समारंभ पार पडला .शहरध्यक्षपदी रोहित गायकवाड ,उपाध्यक्षपदी जाहीर शेख सुनील ,कसबे सचिन जाधव ,महासचिव पदी अजित शिंदे ,शिवाजी पायाल, सचिव पदी आकाश गायकवाड, सहसचिव पदी रत्नदीप सरोदे ,संघटक पदी अरबाज कुरेशी ,प्रसिद्ध प्रमुख सचिन शिंदे ,सहसचिव विकी बनसोडे ,अनिकेत थोरात ,बाबासाहेब इजगज यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.यावेळी सुकटा ग्रामपंचायतचे उपसरपंच भैया जानकर,रामेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा सानप, युवा तालुका अध्यक्ष अक्षय गायकवाड ,वाशी तालुका प्रसिद्धीप्रमुख कृष्ण शिंगारे, आकाश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष महावीर बनसोडे व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.