दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरापासून सुमारे तासाभराच्या अंतरावर असलेल्या गुंडा नामक गावातील कावड यात्रेकरुंच्या वारीवर कोणी तरी अज्ञात इसमाने दगड मारल्यामुळे कावड यात्रेकरू व औंढा नागनाथ येथील नागरिंकांमथ्ये तुंबळ हाणामारी झाली.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा येथील नागनाथ मंदीरात गुंडा गावचे कावड यात्रेकरू काल श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी संध्याकाळी उशिरा मोठ्या संख्येने गेले होते. शिव शंकराच्या नाम स्मरण यामध्ये तल्लीन असलेल्या कावड भक्तांवर नागनाथ मंदीराचे उत्तर गेटजवळ अचानक कोणी तरी अज्ञाताने दगड मारला परिणामी संतप्त दोन गट एकमेकांना भिडले ज्यामुळे तुंबळ हाणामारी सुरु झाली. मिळेल त्याला चोप देत होते.
या गंभीर प्रकरणाची खबर कळताच पोलीस निरीक्षक श्री. हजारे हे घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती काबूत आणण्यासाठी त्यांनी आणखी काही पोलीस अधिकारी व अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात केला. दोन्ही गटांवर हलक्या स्वरुपाचा लाठी मार करुन गंभीर परंतु परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनीही घटनास्थळी धाव घेतली. शहरात सर्वत्र तणावपूर्ण शांतता पसरली असली तरी पुन्हा येथे परिस्थिती अधिक चिघळली जाऊन नये यासाठीचे नियोजन करुन तत्परता सिध्दीस नेली. एवढेच नाही तर कर्तव्यावरील पोलीस फौजफाट्याला अधिक सतर्क राहाण्याचे आदेश दिले.
नगराध्यक्ष श्री खंदारे व शहरातील प्रमुख पदाधिकारी व अन्य राजकीय प्रमुख यांच्या मध्यस्थीने शहरवासिय व कावड यात्रेकरु यांच्यात समन्वय साधून ही हाणामारी नियंत्रणात आणली. मागील महिनाभरापासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत व नामस्मरणात व्यस्त असलेल्या या परिसराला कालच्या हाणामारीने मात्र श्रावणाच्या शेवटी पूरते गालबोट लागल्याचे दिसून आले.
