
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथे महानुभाव पंथाचे ससर्वज्ञ श्री. चक्रधर प्रभू अवतार दिन व अष्टशताब्दी निमित्त श्री. दत्त मंदिर हाळदा येथे पंचावतार उपहार आयोजित करण्यात आला होता. सकाळी सात वाजता गावातील मूख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री. शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थीनी लेझीम पथकासह सहभागी झाले होते. मिरवणूक झाल्यावर दत्त मंदिरात महंत श्री. अनंत व्यास बाबा कामळजकर प्रवचनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी महानुभाव पंथातील महंत, संत, भिक्षुक सहभागी झाले होते. वरील सर्व कार्यक्रमांना गावातील प्रतिष्ठित नागरीक, महीला भगनी लहान थोर सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. पंचावतार उपहार, प्रवचन, आरती झाल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गावातील नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.