
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कराड उंब्रज पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवर असणाऱ्या सराईत टोळीला उंब्रज पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यांत घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत उंब्रज पोलिसांना यश आले कराड तालुक्यांतील उंब्रज महामार्गलगत सैनिक बँकेच्या रोडलागत असणारी एक शॉपी फोडून सुमारे १० हजार ८७० रुपयांचा मुद्देमान व शेजारी असणारे संगणक दुकान फोडण्यांचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना उंब्रज पोलिसांनी गजाआड केले. सदरची घटना गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारांस घडली घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यांत आले होते. रोहित सुदाम कदम( वय २४ रा. अहिल्यानगर पो. माधवनगर सांगली) शैलेश उर्फ महादेव तानाजी पडवळकर ( वय २५रा. माधवनगर सांगली) राहुल नागेश कांबळे (वय३० रा. अहिल्यानगर पो. माधवनगर सांगली) किशोर राजू चव्हाण (वय २२ रा. सध्या रा. अहिल्यानगर पोस्ट माधवनगर सांगली मूळ रा.आटके ता.कराड) अमित अरुण साठे (वय २२रा.कवलापुर ता.मिरज) अशी सराई ताब्यांत घेण्यांत आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रात्रगस्त करणाऱ्या पथकाला सतर्क राहून रात्रगस्त करण्यासांठी सपोनि अजय गरुड यांच्या सूचना होत्या. त्या अनुषंगाने रात्रगस्त पथकाला मिळालेल्या माहितीवरुन दुचाकी वरुन संशयित फिरत असल्यांची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता. सैनिक बँकेच्या रोडला एका दुकानांच्या आडोशाला लपून बसलेले पाच-जण पळून जाण्यांच्या तयारीत असताना दोघाजणांना पोलिसांनी पकडले तर अन्य तीन-जण पळून गेले पळून गेलेल्या संशयितांचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांनाही पकडले. यावेळी संशयितांची तपासणी केली असता. त्यांच्याकडे दरोडयांसाठी वापरण्यांत येणारी घातक शस्त्रे यांमध्ये दोन लोखंडी ,कटावण्या दोन कोयते मिरचीपूड असे साहित्य तसेच दोन दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख २० हजार २२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी हे सांगली जिल्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यांचे निष्पन्न झाले असून दरोडाच्या तयारीत आरोपींवर मर्डर, हाफ मर्डर ,मारामारी घरफोडी चोरी असे यासारखे गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. सदरची कामगिरी मान्यनीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गरुड, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांच्यासह उंब्रज पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.