
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
राजकीय पक्षाच्या नेत्या सोबत सभा घेणाऱ्या अधिकाऱ्यावर आमचा विश्वास नाही – भू:खलनग्रस्त पीडीत
घुग्घुस
घुग्घुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना नागरिकाच्या तीव्र रोशाला सामोरे जावे लागले. घुग्घुस येतील भू:खलनग्रस्त 160 कुटुंबांना नवीन घरे बांधून देण्याचे व जोपर्यंत घर मिळणार नाही तोपर्यंत दरमहा 3000 भाडे देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी पीदूरकर यांनी काल प्रकल्पग्रस्तांना दिले होते. आज लेखी स्वरूपात देण्याचे सुद्धा त्यांनी मान्य केले होते. आश्वासन देताना त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते व घुग्घुस ठाणेदार उपस्थित होते. घर भाडे चेक स्वरूपात देतो असे मुख्याधिकारी म्हणाले होते, परंतु आज अचानक नगदी घर भाडे मिळेल असे सांगितले.
कोणताच करारनामा नाही, घर भाडे चेकने नाही तर नगदी मिळत आहे, शासकीय अधिकारी शब्द फिरवत आहेत हे बघून सर्व पिडीतांनी घरभाडे घेण्यास नकार दिला. तुमचा मनात पाप नाही तर लिहून देण्यास काय हरकत आहे असे मुख्याधिकाऱ्यांना विचारले. तुम्ही प्रशासकीय अधिकारी असताना काल राजकीय नेत्यांना का बर सोबत आणले होते ? सोबत आणलेल्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तुम्ही यायला पाहिजे होते, त्याला कशाला आणले होते असे नागरिक ओरडताचं मुख्याधिकारी यांनी काढता पाय घेतला.