
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : येथील एका पोलीस कर्मचाऱ्याने धाब्यावर जावून दारु प्याले ल्या अवस्थेत कमालीचा धिंगाणा घातला. त्यामुळे धाबा मालकाने नवा मोंढा पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एका धाब्यावर पोलीस कर्मचाऱ्याला बिलाचे पैसे मागितले असता त्याने धिंगाणा (हैदोस) घालून अर्वाच्य शब्दप्रयोग केला. धाबा मालकाने नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून धिंगाणा घातलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे पोलीस दलाची बदनामी झाली आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख करण्यापेक्षा काळ सोकावता कामा नये, हे ध्यानी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.