दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील खुनातील फरार आरोपी विजय जाधव यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मनसे शहर अध्यक्ष सचिन पाटील यांचा निर्दयी खून करुन फरार आरोपी विजय जाधव याच्या मागावर असलेल्या पोलीस पथकाला खबर मिळताच त्यांनी काल सोमवारी दुपारी सेलू रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला होता. विजय जाधव हा रेल्वे स्थानकात येताच त्याच्यावर मागावर असलेल्या पथकाने शिताफीने झडप घालून त्याला जेरबंद करण्यात यश मिळविले.
==========================
पोलीस उपनिरीक्षक जनरुद्दीन जहांगीरदार, एन्.एम्. रणमाळ, अनील हत्तीअंबीरे, शिवाजी दुधाटे आदींचा या पथकात समावेश होता.
=========================
सचिन पाटील यांचा खून करुन फरार झालेल्या आरोपी विजय जाधव याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तैनात केली होती. विविध भागांतून माग काढणारी ही पथके प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. प्रत्येक पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या खोबऱ्याच्या संपर्कात राहून कार्यरत होते. त्यापैकी पोलीस उपनिरीक्षक जैनुद्दीन जहांगीरदार यांच्या पथकाला अखेर जाधव यास पकडण्यासाठीचे यश आले असल्याने पोलीस दलात आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. .
