
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-
जालना दि. बहुजन जनता दलाच्या वतीने राज्यात गाव तेथे बहुजन जनता दल शाखा स्थापन या राज्यस्तरीय अभियान कार्यक्रमांतर्गत बहुजन जनता दल जालना जिल्हा शाखेच्या नाम फलकाचे अनावरण जालना नांदेड रोडवर बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जनता दर जालना जिल्हा अध्यक्ष डॉ बाबासाहेब पाटील यांनी केले होते प्रमुख पाहुणे बहुजन जनता दलाचे माजी नगरसेवक केशवराव गंगणे माजी नगरसेवक रामदास डोरले नारायण माळवे ग्रा. पंचायत सदस्य. शांताराम यवतकर ग्रा पंचायत सदस्य.विकी मर्दानी जालना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दादासाहेब तोरडे पाटील यांनी केले यावेळी जोखान सय्यद बंडू मामा शरद गारदे हिम्मत पाटील रोहित लांडगे राजेश जानकर दीपक पाटील महेंद्र सुरवाडे काशीराम ठाकरे किशोर तिवारी हेमंत गायकवाड दीपक कांबळे विकी जामणी यांच्यासह बहुजन जनता दलाच्या सर्व आघाडी प्रमुख व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दल जालना जिल्हा अध्यक्ष डॉ बाबासाहेब पाटील यांनी कळविले आहे