
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचालित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या अभ्यास केंद्राने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विभागीय केंद्र नांदेड कडून आज दि.२४ सप्टेंबर२२ रोजी नांदेड येथे आयोजित संपन्न झालेल्या युवक महोत्सवात महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने समुहगीत गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकले.एवढेच नव्हे तर प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे तसेच संघ प्रमुख डॉ.संतोष पाटील, शव्यवस्थापक सौ. गीते सीमा , वादक राजू कांबळे या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन