अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हल्ल्याची वेळच जाहीर केली…
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून एक महत्त्वपूर्ण भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात युद्ध अजून संपलेले नाही.
ऑपरेशन एपिक फ्युरी’ सुरूच असे स्पष्ट केले आहे.
यासोबतच त्यांनी, पुढील दोन ते तीन आठवड्यांत कठोर भूमिका घेतली जाईल असे म्हणत इराणवर पुन्हा एकदा मोठा हल्ला करणार असल्याचे जाहीर केले. तसेच इराणमधील प्रमुख लक्ष्ये लवकरच साध्य केली जातील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
इराणवर मोठ्या हल्ल्याचा इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात , “आमची लक्ष्ये साध्य करण्यासाठी आम्ही आमची मोहीम सुरूच ठेवू. अमेरिका लवकरच आमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर आहे.” असे म्हटले. तसेच, “पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांच्यावर खूप जोरदार हल्ला करणार आहोत. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात घेऊन जाऊ, जिथे त्यांचे खरे स्थान आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘ऑपरेशन फ्युरी’ सुरूच राहील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, “ऑपरेशन फ्युरी” सुरूच राहील. ते म्हणाले, आज संध्याकाळी बोलत असताना, अमेरिकेच्या लष्कराच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे.
गेल्या चार आठवड्यांत, आमच्या सैन्याने रणांगणावर निर्णायक आणि जबरदस्त विजय मिळवले आहेत. असा विजय जो यापूर्वी फार कमी लोकांनी पाहिला असेल.
वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी
त्यांनी इराणला इशारा दिला की, जर कोणताही करार झाला नाही, तर त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल. ट्रम्प म्हणाले, “जर ते तडजोड करण्यास तयार नसतील, तर आम्ही त्यांच्या सर्व वीज निर्मिती प्रकल्पांवर, शक्यतो एकाच वेळी, मोठा हल्ला करू.” इराणमधील सत्तापालटाबाबत, ट्रम्प यांनी सांगितले की हा हल्ला कधीही सत्तापालटाच्या उद्देशाने नव्हता, तर त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर सत्तांतर झाले होते.
त्यांनी पुनरुच्चार केला की इराणचे नौदल नष्ट झाले आहे, त्यांचे हवाई दल उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांचे बहुतेक सर्वोच्च नेते आता मरण पावले आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सवरील त्यांचे नियंत्रण आणि कमांड पूर्णपणे नष्ट होत आहे. युद्धाच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही शत्रूला केवळ काही आठवड्यांत इतके अचूक आणि मोठे नुकसान सोसावे लागले नाही.
