
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अधिकाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कोणत्याही सत्तेत असणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन त्रास देऊ नका – अजित पवार
————————————
सातारा : आमच्याकडे सर्व संस्था होत्या, पण आम्हाला सत्तेचा माज नव्हता. आज जे काही चाललं आहे. अधिकाऱ्यांनो कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कोणत्याही सत्तेत असणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन त्रास देऊ नका.
आम्ही सत्तेत कधी येऊ, हे तुम्हाला कळणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.
साताऱ्यातील मार्डी या गावी कै.आ.सदाशिव तात्या पोळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज, रविवारी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला. तसेच यावेळी अजित पवारांनी आशिष शेलारांवर टीकास्त्र सोडलं.
महाविकास आघाडी, दसरा मेळाव्या बाबत केलेल्या आशिष शेलार यांनी टीका केली. त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकेकाळी त्यांचे दोन खासदार निवडून आले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे शेलार हे २०१४ ते २०१९ मध्ये निवडून आले आहेत. सध्या त्यांचे दिवस असल्यामुळे ते बोलणारच, अशी टीका अजित पवार यांनी केली.
दरम्यान, अजित पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर अजित पवार भडकले. उद्धव ठाकरे यांना १९९६ मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते असं माजी मंत्री सुरेश नवले म्हणाले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले,. आता वर्ष कुठले चालले आहे. कशाला जुनं उकरून काढताय ? मी उत्तर देवून काय होणार आहे. असले धंदे बंद करा. बेरोजगारीवर तुम्ही बोलत नाही आणि असल्याप्रश्नांना प्रसिद्धी देता ? असा खोचक उत्तर अजित पवारांनी दिलं आहे.