
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:
दिनांक २.१०.२०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत राज्य सरकारने वीस पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याबाबतची चर्चा झाली. शिक्षण हक्क कायद्यातील कलम चारनुसार वस्तीपासून एक किलोमीटर अंतरावर पाचवीपर्यंत आणि तीन किलोमीटरवर आठवीपर्यंतचे शिक्षण मिळाले पाहिजे. कमी पटसंख्येचे कारण देऊन शाळा बंद केल्यास मुलांना खूप अंतर पायी पायी चालत जायला लागेल. वाटेत घनदाट जंगल, ओढे, नदीनाले, महामार्ग, रेल्वे रूळ, खाडी असतात. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस कोसळत असतो. शाळा दूर अंतरावर गेली की मुलींचे शिक्षण थांबेल. ६ ते १४ वयोगटातल्या मुलांना तीन किलो मीटर पेक्षा जास्त अंतर चालायला लावू नये असे सर्वोच्च न्यायालयाने ८.९.२०१७ रोजी दिलेल्या निकालात म्हटले आहे. वंचित बहुजन, आदिवासी आणि दलित मुलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जाईल. शाळाबाह्य मुलांची संख्या वाढेल. बालमजुरी आणि मुलींचे बालविवाह वाढतील अशी भीती वाटते. शाळा बंद करणे म्हणजे संविधानाची पायमल्ली केल्यासारखे होईल. घटनेशी विसंगत असलेला शाळा बंद करायचा निर्णय मागे घेऊन वाडी,वस्ती ,तांड्यावरील 0-20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाच्या हुकुमी निर्णय वापस घ्यावे यासाठी गोर सेना देगलूर च्या वतीने देण्यात आले यावर गोर सेना तालुका अध्यक्ष विशाल पवार, उपाध्यक्ष बालाजी जाधव,सहसचिव सतीश चव्हाण,तालुका संपर्क प्रमुख कपिल नाईक,तालुका संघटक गणेश चव्हाण,तालुका कोषाध्यक्ष प्रमोद राठोड आदी च्या स्वाक्षरीने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय, गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी आदी ना निवेदन देण्यात आले..
देगलूर तालुक्यातील आलूर, लिंबा, शेकापूर, मलकापूर, मुजळगा,बिजलवाडी दक्षिण तांडा,बीजलवाडी पश्चिम तांडा,गवंडगाव तांडा,काठेवाडी, दावनगीर तांडा,लोणी तांडा,मरखेल तांडा,बेम्बरा तांडा,मोतीराम तांडा मानूर,गोगला गोविंद तांडा,इब्राहिमपुर, तडखेल तांडा ह्या गावातील गुणवत्ता वाढीसाठी जे काही सोयीसुविधा लागतात ते उपलब्ध द्यावे ,जर ह्या शाळा बंद झाल्या तर येथील गावामध्ये बेरोजगारी चे प्रमाणे वाढेल. शाळा बंद करण्याचा जो निर्णय शासनाने मागे घ्यावा अन्यथा गोर सेना देगलूर च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.