
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
वन्नाळी येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयातील कलाध्यापक बालाजी पेटेकर यांच्या रांगोळीचे प्रदर्शन नुकतेच श्री भगवान बालाजी मंदिर नरसी येथे करण्यात आले.
रांगोळी हा विषय तसा स्त्रियांच्या अखत्यारीत ला..पुरुषानी रांगोळी काढावी हे कौतुकास्पदच.याला बालाजी पेटेकर हे अपवाद ठरवत आपल्या सुंदर रांगोळी नी सर्वांचे लक्ष घेवुन घेतले.
नवरात्र दुर्गा महोत्सवानिमित्त श्री बालाजी मंदिर नरसी तर्फे दरवर्षी दुर्गा नवरात्र उत्सवाचे उत्साहात आयोजन केले जाते.त्यामध्ये विविध धार्मिक,कलात्मक व सामाजिक कार्यक्रम पार पाडले जाते. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.अश्व रथाच्या पालखीतून श्री भगवान बालाजीच्या मुर्त्यांची मिरवणूक अत्यंत भावपुर्ण भक्तिने केली जाते. आणि नरसी नायगाव परिसराबरोबरच जिल्ह्यातील व महाराष्ट्र बाहेरील अनेक भक्तगण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात.अशावेळी श्री शिवशंकर विद्यालय वनाळीचे कलाध्यापक,कवी बालाजी पेटेकर सर यांनी काढलेल्या दुर्गा मातेची रांगोळी विशेष आकर्षणाचा विषय ठरला.अनेक कलावंतांनी,महिलांनी या रांगोळीचे विशेष कौतुक केले.त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी आपल्या रांगोळीचे कार्यशाला घेतली होती.या पुर्वी ते अनेक जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकानी रांगोळी स्पर्धा जिंकले.त्यांच्या कलेचे कौतुक करत भगवान श्री बालाजी मंदिर समिती नरसी तर्फे त्यांचा सपत्त्निक सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रावण पा.भिलवंडे,वसंत सावकार मेडेवार,विनोद सावकार बच्चेवार,दै.पुण्यनगरीचे ता.प्रतिनिधी बाळासाहेब पांडे सर,श्रीराम सावकार मेडेवार,बाबूराव सावकार शक्करवार,ज्ञानेश्वर जोशी महाराज,पवन गादेवार,साईनाथ सावकार मेडेवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.बालाजी पेटेकर सर यांनी काढलेल्या रांगोळीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.