
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
कल्याणकारी योजना नागरिकांच्या घराघरात पोहोचवा बूथ बैठकीत निर्णय
भूम:-आगामी नगर परिषदसह जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रा.पं.निवडणूकिच्या अनुषंगाने कार्यकर्त्यानी सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या कल्याणकारी योजनेची घरोघरी माहिती देवून जनसंपर्क वाढवावा असे आवाहन करून सर्वाच्या मागणीनुसार शहरात एस बी आय बैंकेची शाखा सुरु करण्यासाठी पाठपूरावा करू अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी बैठकित दिले.
बुधवार दि १२ रोजी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे शक्ति केंद्र व बुथ प्रमुखांची बैठक जिल्हा अध्यक्ष नितीन काळे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थित भूम शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली.
बैठकीमध्ये आगामी नगर पालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकिच्या अनुषंगाने प्रत्येक बुथ सक्षम झाले पाहिजे, भाजप सरकारच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी ज्या योजना राबवलेल्या आहेत, त्या योजनांची जाणीव जागृती प्रत्येक कुटुंबाला करून द्यावी यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष जनसंपर्क अभियान राबवाव, मतदारांची संपर्क वाढवावा असे आवाहन केले.
या दरम्यान सर्वच पदाधिकाऱ्यांनी भूम येथे कार्यरत असलेल्या एस बी आय बँकेमध्ये जवळपास एक लाखाच्या आसपास खातेदार असल्यामुळे येथे खातेदारांना ताटकळत थांबावे लागते, दिवस दिवस घालवावा लागतो, खातेदारांची गैरसोय टाळण्यासाठी भूम शहरात शहर शाखा स्वतंत्रपणे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आ. सुजितसिंह ठाकुर,माजी मंत्री आ.राणा जगजितसिह पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.भागवतजी कराड यांचेकडून मंजुरी मिळवून द्यावी अशी मागणी केली असता या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांनी दिली.
यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य जालिंदर मोहिते,जिल्हा सरचिरणीस आदम शेरव, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर,सरचिरणीस संतोष सुपेकर,शहर अध्यक्ष शंकर खामकर, जेष्ट व्यापारी चंद्रकांत गवळी, विधीज्ञ संजय शाळू, माजी नगरसेवक रोहन जाधव, सचिन बारगजे,प्रदिप साठे,सुदाम पाटिल, महेबूब शेख, मुस्तका पठाण,सचिन मस्के, उमेश नायकिंदे, बाबासाहेब वीर ,संतोष औताडे, लक्ष्मण भोरे,केशव वेदपाठक,सुजित वेदपाठक , बोराडे. उद्योग आघाडि तालुका अध्यक्ष बापू बगाडे, भटक्या विमूक्त चळवळीचे प्रदेश सरचिटणीस शंकर पवार ,भाजप महिला आघाडि तालुका अध्यक्षा लताताई गोरे सह असंख्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उझपस्थिती होती.