
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – लोहा शहरात संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयाच्या प्रांगणात लोहा शहराचे प्रथम नगराध्यक्ष कै माणिकराव पा पवार यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . कै माणिकराव पा पवार म्हणजे लोहा शहराचे विकासाचे शिल्पकार असल्याचे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॉ अशोक पा गवते यांनी केले .
कै माणिकराव पा पवार यांचा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात मोलाचा वाटा असुन त्यांच्या कार्यकाळात लोहा शहरात विकासाची गंगा त्याची खेचुन आणी व त्यावेळेस गोरं गरीब जनतेची सेवा केली जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी खा भाई केशवरावजी धोंडगे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची गंगा यावेळी खेचुन आणली असे प्रतिपादन यावेळी प्राचार्य डॉ अशोक पा गवते यांनी केले . त्यांच्या लोहा शहरातील गाडगे महाराज विद्यालयातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचा कार्याला उजाळा देण्यात आला .
या कार्यक्रमाला प्राचार्य अशोक पाटील गवते, प्रा. डाॅ डी.एम पवार सर, उपनगराध्यक्ष दत्ता वाले , माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार , केशवराव मुकादम , प्रा. गुंडावार सर, बी. डी जाधव, मुख्याध्यापक बोधगिरे सर, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण , दिनेश तेललवार, दीपक रूद्रावार, धोंडिबा कोटलवार, प्रा. बेंडे सर, प्रा. रावनगावे सर, प्रा. काळे सर, आदिंची उपस्थिती होती.