
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सचिव श्री अमृत सोपानराव पा. आलूरकर यांचा वाढदिवस ISO मानांकन प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आलूर येथे मोठ्या उत्साहात विद्यार्थी- विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वहीचे वाटप करून साजरा करण्यात आला.
श्री अमृत सोपानराव पा. आलुरकर यांनी इतरत्र केक फटाके या सर्व गोष्टींना फाटा देऊन आपण काही समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन अवाढव्य पैसा खर्च न करता विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले व एक वृक्ष रोपण करून जगविण्याची हमी घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भावी जिल्हा परिषद सदस्य श्री विष्णुकांत पा. खांडेकर, सुगत वाघमोडे नंदुरकर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री मठपती सर, श्री चामावार सर, श्री वाडेकर सर, श्री कडलवार सर, श्री करेवाड सर, श्री अजगरे सर, सौ. भालके मॅडम, सौ.पा. मॅडम भाजप युवा मोर्चाचे संजय पोकरणे आदींची उपस्थिती होती. तसेच वाडेकर सर मनोगत व्यक्त करताना गावातील प्रत्येक नागरिकांना व मुलाबाळांना असे आव्हान केले की वाढदिवसाचा अवाढव्य खर्च बाजूला सारून शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना सढळ मनाने निसंकोचपणे मदत केली तर योग्य होईल असे मनोगत श्री वाडेकर सर यांनी व्यक्त केले. तर अमृत सोपानराव पाटील यांनी जो उपक्रम राबवला या उपक्रमाचे कौतुक व आभार श्री मठपती सर व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मानले