
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
ग्रुप ग्राम पंचायत मांदाटणे आणि हारीत ग्राम सेवा संस्था महाड यांच्या सौजन जागतिक हात धुणे
व डॉ ए. पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून रा जी प शाळा पाष्टी आणि मांदाटने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या वेळी सरपंच चंद्रकांत पवार हे अध्यक्षस्थानी होते संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कडू, हारीत ग्राम सेवा संस्थेचे अध्यक्ष संदेश मंगेश साळुंके ग्रामसेवक पी बी ठाकरे, केंद्र प्रमुख कतोरे सर ,गायकवाड सर, महादेव पवार सर आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना हात कसे धुवावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले व साहित्य वाटप करून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्व शिक्षक यांनी सर्वांचं आभार मानले