
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना उपनेते श्री.बबनरावजी घोलप साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन
अमरावती शहराच्या वतीने दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करुन माजी समाज कल्याणमंत्री बबनरावजी घोलप यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्ते श्री.रविंद्रजी राजुसकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी विशेष उपस्थितीत राष्ट्रीय चर्मकार महासंघचे अमरावती शहरअध्यक्ष श्री.सचिन जा. वाटकर,शहर उपाध्यक्ष श्री.अनिल म.सावरकर,रविंद्र उज्जैनकर,कृष्णा विजयकर,राजेश सावरकर,अवि घोरे,अजिंक्य सावरकर,कैलास पिढेकर,विजय डी.सावरकर,धनराज नांदुरकर,सागर वाटकर,अरविंद सावरकर,विनोद कोठेकर,मंगेश चव्हाण,दिनेश वाटकर इत्यादी सह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.