
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
ता. कोरेगांव येथील तीर्थक्षेत्र श्री.सोळा शिवलिंग शनिश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने अध्यात्मिक उपक्रमासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवली जातात. दरवर्षीप्रमाणे दिपावालीच्या सणानिमिंत्त वर्षभर श्री. शनिश्वर देवस्थान येथे निष्काम भावनेने सेवा करणाऱ्या शनी भक्तांना दिवाळीच्या फराळाचे साहित्य संपूर्ण पोशाख आणि रोख रकमेही आदीं विशेष भेट दिली जाते. तसे जो का रंजला गांजला तोच आपला म्हणून गोरगरिबांनाही दिवाळी किट दिले जाते. शनिश्वर देवस्थान ट्रस्ट माध्यमांतून काही हातकरु मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात या मुलांना दिवाळी निमिंत्ताने फटाके,कपडे आकाश कंदील अशा वस्तूंचे वाटप केले जाते. या दिवाळी भेट वस्तूंचे वाटप मठाधिपती तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज आणि उद्योजक राकेश शेठ उद्योजक शंकर शेठ नाथ देवस्थान ट्रस्टवीर तालुका पुरंदर पुण्यांचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ उद्योजक नरेंद्र बाबर अविनाश धुमाळ ज्ञानेश्वर पाडळे विजय पवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यांत आले. यावेळी प्रत्येकांने आपल्या क्षमतेनुसार दिवाळी सणाच्या निमिंत्ताने दान करावे तशी सद्बुद्धी श्री. देव शनीदेव सर्वांना देओ असे शुभाशीर्वाद मठाधिपती शिवाजी नंदगिरी महाराज यांनी दिले.