
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
दि.15 ऑक्टोबर
देगलूर शहरात आज सतत चार वर्षा पासून अत्यंत क्रियाशील पणे अनेक प्रभावी वक्ते घडवणारी एकमेव मोटिवेशनल अकॅडमी म्हणून नावारूपास आलेली प्रा.मुबिन सरांची,पॉवर ऑफ कॉन्फिडन्स अकॅडमी मध्ये आज पूर्व राष्ट्रपती ए. पी.जे.अब्दुल.कलाम यांची जयंती आज “वाचन प्रेरणा दिवस” या रूपाने मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.खंडगावे सर व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.पांढरे सर तर प्रमुख वक्ते म्हणून या अकॅडमी चे संचालक प्रा.मुबिन सर हे होते.या कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीं सर्वप्रथम पुस्तकांचे वाचन केले उपस्थित मान्यवरांचे मुबिन सर यांनी पुष्पहार,पुस्तकं व पेन देऊन सत्कार केले आणि नंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुबिन सरांकडून विदयार्थ्यांना पेन भेट स्वरूपात दिले काहीं विदयार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले व नंतर प्रमुख पाहुणे प्रा.पांढरे सर यांनी विदयार्थ्यांना एकाग्रता वाढवण्या बद्दल आणि आपल्यातील प्रतिभेमुळे आपली ओळख असते असे मार्गदर्शन केले आणि प्रमुख वक्ते प्रा.मुबिन सरांनी मुलांना आपल्या भाषणाद्वारे सांगितले की आपण विद्यार्थी दशेत संघर्ष करत करत आपले ध्येय प्राप्त केले पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या विषयी प्रेरणादायी भाषण दिले आणि आपल्या जीवनातील संघर्षाची छोटीशी घटना ही त्यांनी विदयार्थ्यां समोर मांडली आणि अध्यक्ष समारोप मध्ये प्रा.खंडगावे सर यांनी गुरु-शिष्यच्या नाते संबधी विविध घटना सांगून त्याचं महत्व स्पष्ट केले.आणि आपण विद्यार्थी यांनी गुरूंना विसरू नये असा संदेश दिला.या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन दिव्या चव्हाण या विद्यार्थिनीने केला तर आभार प्रदर्शन रविना यांनी केले.