
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:तालुक्यातील मरखेल येथील मरखेलकर वाजीत समीमसाब यांना महिलांसोबतचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागीतली, अशी तक्रार मरखेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मरखेलकर वाजीत समीमसाब (३१, रा. मरखेल ता. देगलूर जि. नांदेड) यांच्या ९९६०५७५१७९ क्रमांकाच्या मोबाईलवर १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ६२८९५०२३७१०८६ या क्रमांकावरुन व्हाईस कॉल करुन अज्ञात व्यक्तीने मला तुम्ही रुपी एम्पायर अॅपवर तात्काळ कर्जाची रक्कम भरा अन्यथा तुमचे महिलांसोबत अश्लील फोटो तुमच्या संपर्कातील लोकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. यासोबतच क्र.९२३२२४६३६३६१३, ९२३२२४८५८६२५, ९२३२६४४८८७४७ या क्रमांकावरुन व्हाईस व व्हॅटस्अॅप व्हाईस कॉल्सद्वारे व व्हॅटस्अॅप मेसेज करुन मला संपर्क केला. त्यात त्या अज्ञात व्यक्तीने समोरुन तुम्ही रुपी एम्पायर ॲपवर तात्काळ कर्जाची रक्कम भरा अन्यथा तुमचे महिलांसोबत अश्लिल फोटो बनवून बदनामी करतो, अशी धमकी दिली. या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.