
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत कार्यरत असलेले निळा येथील बालाजी पाटील मोरे यांची लोहा तालुक्याच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष नुकतीच निवड करण्यात आली आहे .
लोहा येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदनियुक्ती सोहळा व बैठक संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सतत कार्यरत असलेले निळा येथील बालाजी पाटील मोरे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य देशमुख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गजानन पा कऱ्हाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोहा कंधार विधानसभा सरचिटणीस बाळा पाटील क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाला वैभव टेकाळे , स्वप्नील पांचाळ, संभाजी पा.मोरे , नारायण पा हिलाल, माधव मुंडे, गजानन कानगुले,प्रदिप पाटील वडजे , आदिंची उपस्थिती होती व यावेळी लोहा / कंधार तालुक्यातील निवडी जाहीर करण्यात आल्या.