
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. येणारं वादळ हे ‘सीतरंग’ या नावानं (Sitrang Cyclone) ओळखलं जाणार आहे. २० ते २१ ऑक्टोबरच्या दरम्यान हे चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पण त्या वादळाचं मार्गक्रमण कसं राहिलं अद्याप निश्चित सांगता येणार नाही. मात्र, येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमाराला पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सीतारंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिवाळीत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगाल आणि लगतच्या भागात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, २२ ऑक्टोबरपर्यंत याचं चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर हे वादळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने जाहीर केलं आहे.
सध्या महाराष्ट्रात परतीचा पाऊस कोसळत आहे. दिवाळीत देखील पावसाचा जोर असण्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आाहन देखील हवामान विभागानं केलं आहे. सध्या एकीकडं राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. उत्री पिकं पाण्यात असल्यानं हाती काहीच उत्तन्न येण्याची शक्यता नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच पुन्हा हवामान विभागान २३ आणि २४ ऑक्टोबरला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.