
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढील प्रमाणे मागण्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन करण्यात आल्या आहेत.हिमोफिसा आजारांवर विष्णूपुरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार पद्धती सुविधा सुरू करण्यात यावी. सिरसी(बु.)ता.कंधार येथील लाभधारकांना कोपनकार्ड वाटप करण्यात यावेत. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत तारा जमीनीच्या एकदम जवळ आल्या आहेत.पोल झुकले आहेत त्यामुळे जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे.विद्युत पुरवठ्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे दुरुस्ती करून देण्यात यावी.राज्य विकास आराखडा २०२१-२२ रस्ता क्रमांक २५५ बारूळ ते पेठवडज तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा.अशा मागण्या जिल्हाधिकारी साहेबांना सामाजिक कार्यकर्ते श्री.पांडूरंग कंधारे,श्री.व्यंकटी जाधव श्री.तेटवाड गणपत माधवराव मू.कल्लाळी ता.कंधार (हिमोफिया रुग्ण), यांनी मागणी केली आहे.