
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 26/10/2022 रोजी स्वर्गीय सायाबाई मष्णाजी निलमवार यांच्या पुण्यस्मरण दिन व दिवाळी निमित्त गोरगरीब लोकांना भोजन आणि वस्त्रदान करण्यात आले. श्री नागनाथ मष्णाजी निलमवार यांच्याद्वारे दरवर्षी आईच्या पुण्यस्मरण व दिवाळी सण निमित्य 2008 पासून नियमितपणे गोरगरीब लोकांना भोजन व वस्त्रदान करण्यात येते यामध्ये जवळपास 50 साडी/ लुगडे व 100 व्यक्तींना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली जाते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामलु मष्णाजी निलमवार, मल्लाना काळोजी निलमवार, जवाहर लक्ष्मणराव निलमवार, आकाश नागनाथ निलमवार व समस्त निलमवार परिवारांचे सहकार्य लाभले.