
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी चंद्रपूर- संभाजी गोसावी.
पवनी जिल्हा भंडारा येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी रिना यादवराव जनबंधू यांची पदोन्नतीने चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक पदावर करण्यांत आली त्यांनी आज दुपारी चंद्रपूर पोलीस मुख्यालयांत हजर राहून आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. माजी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली झाल्यापासून मागील काही वर्षापासून अप्पर पोलीस अधीक्षक पद हे चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रिक्त होते. गुरुवारी गृह विभागांने २३ पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापनेचे आदेश जारी करण्यांत आले. यामध्ये बुलढाणा,यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांला नवे अप्पर पोलीस अधीक्षक मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यांत पहिल्यांदाच अप्पर पोलीस अधीक्षक पदावर महिला अधिकारी विराजमान झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रह अधीक्षक आता अप्पर पोलीस अधीक्षक व शहर व जिल्ह्यांतील सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर अनेक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी रुजू झाले आहेत. रिना जनबंधू यांनी आज दुपारी चंद्रपूर पोलीस मुख्यालयात हजर राहून आपला पदभार स्वीकारला यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यांतील अनेक वरिष्ठ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थिंतीत रिना जनबंधू मॅडम यांचे स्वागत करण्यांत आले.